रस्सा:
साहित्यः
१. दुधी - १/२ कि.
२. सोडे - १ वाटि
३. कांदा उभा चीरुन - १ मध्यम
४. ओलं खोबरं - १/२ वाटि
५. लसुण पाकळ्या - ४
६. आख्खे धणे - १ चमचा
७. जीरं - १/२ चमचा
८. सुख्या लाल मिरच्या - २
९. हळद - १/२ चमचा
१०. मसाला - २ चमचे (टिप नं १ बघा)
११. तेल
१२. चींचेचा कोळ किंवा १/२ लिंबाचा रस
१३. चवीनुसार मीठ
१४. बारीक चीरलेली कोथिंबीर
कॄती:
१. सोडे स्वःच्छ धुवुन बाजुला ठेवा
२. एका फ्राय पॅन मधे १ चमचा तेल तापलं कि अनुक्रमे त्यात कांदा, लसुण पाकळ्या, खोबरं, धणे-जीरं आणि सुख्या लाल मिरच्या घालुन परता
३. खमंग परतल कि मिक्सरमधे वाटुन त्याची मुलायम पेस्ट करा
४. आता एका नॉनस्टिक पॅन / कढई मधे ५ पळ्या तेल तापलं कि १ चमचा मोहरी घाला
५. मोहरी तडतडली कि हिंग, हळद घाला. आता वाटलेली पेस्ट घालुन परतत रहा
६. कडेने तेल सुटु लागलं कि २ चमचे मसाला घाला
७. मसाल्याचा कच्चा वास गेला कि चीरलेला दुधी आणि सोडे घाला
८. गरजेपुरतं पाणी, लिंबाचा रस घालुन मंद आचेवर रस्सा शीजु द्या. मधुन मधुन पाण्याचं प्रमाण चेक करुन रस्सा ढवळत रहा
९. दुधी शीजला कि गॅस बंद करुन बारीक चीरलेली कोंथींबीर पेरा
१०. गरमागरम रस्सा भाताबरोबर किंवा तांदुळाच्या भाकरीबरोबर हाणा. आज डब्यात हाच मेनु आणलाय.
टिपा:
१. साहित्यात जो मसाला म्हणालोय जो खासकरुन नॉनव्हेज करता वापरतात पण अगदि नसेलच तर कांदा-लसुण मसाल्यानी पण चव येईल
२. दुधी एवजी वांगी-सोडे पण रस्सा करतात...माझ्या मते ती सीकेपी स्टाईलने अधीक चवीष्ट बनते
३. रस्सा म्हटलं कि बटाटा हा हवाच...तो जरुर घाला. माझा राहिला
