साहित्यः
२२५ ग्रा. ताजे पनीर, किसलेले
१ कंडेन्स्ड मिल्क टिन ( मी ३/४ वापरला, आपल्या चवीप्रमाणे प्रमाण कमी-जास्तं करावे)
२ टेस्पून रोज सिरप (रंग आणि चवीसाठी)
१/२ टीस्पून पिस्तापूड
१/२ टीस्पून वेलचीपूड
पिस्त्याचे काप सजावटीसाठी
पाकृ:
नॉन-स्टीक पॅनमध्ये पनीर व कंडेन्स्ड मिल्क एकत्र करावे.
मिश्रण मध्यम आचेवर सतत ढवळत रहावे.
१५-२० मिनिटांनी मिश्रण थोडे दाट होईल, तेव्हा त्यात रोझ सिरप मिक्स करावे.

सतत ढवळत रहा.
मिश्रणाला घट्टपणा येईल आणि मिश्रण कडेने सुटू लागेल, छान रवाळ दिसू लागेल तेव्हा गॅस बंद करावा.
मिश्रण अति कोरडे करु नये, पनीर चिवट होईल नाहीतर, त्यात थोडा ओलसरपणा हवा.
त्यात पिस्तापूड व वेलचीपूड घालून मिक्स करणे.

तुपाने ग्रीझ केलेल्या थाळीत मिश्रण ओतावे व चमच्याने छान पसरवून घ्यावे.
त्यावर पिस्त्याचे काप लावून हलके दाबावे.
थोडे गार झाल्यावर सुरी फिरवून चौकोनी आकारात कापावे पण कलाकंद लगेच उचलू नका, सेट होऊ द्या.
पूर्ण गार होऊ द्या.

हा रोझ कलाकंद खाण्यासाठी तयार आहे.
फ्रिजमध्ये ठेवल्यास ३-४ दिवस चांगला राहतो.
आवडत असल्यास ह्याला मोदकांचा आकार ही देता येईल.
पाककृतीत कंडेन्स्ड मिल्कचा गोडवा पुरेसा आहे.
गणपती बाप्पा मोरया !!
__/\__