साहित्यः
रीकोटा चीझ १ टब किंवा २५० ग्रा.
कंडेन्स्ड मिल्क टीन - ३५० ग्रा. (मी अर्धा टीन वापरला)
१/४ वाटी गरम दुधात केशर चुरडून मिसळलेले
१/४ टीस्पून भरडसर कुटलेली वेलची
पाकृ:
नॉन-स्टीक पॅनमध्ये रीकोटा चीझ काढून सतत मध्यम आचेवर ढवळत रहावे.
आधी चीझ पातळ होईल, मग १५-२० मिनिटांनी त्यातील ओलसरपणा कमी होऊन ते खव्याप्रमाणे कणीदार, गोळा होऊ लागेल.
ह्यात आता आपल्या चवीप्रमाणे कंडेन्स्ड मिल्क ओतावे, मला बरोबर अर्धा टीन लागला.
कंडेन्स्ड मिल्क मिक्स केल्यानंतर केशर मिश्रीत दूध घालावे व सतत ढवळत रहावे.

२०-२५ मिनिटांनंतर मिश्रण आळु लागेल, ह्यात आता वेलची घालून मिक्स करावे.
थोडेसे मिश्रण प्लेटवर काढून त्याचा गोळा करुन पहावा, गोळा नीट झाला म्हणजे मिश्रण पर्फेक्ट तयार झाले.
गॅस बंद करुन मिश्रण पूर्ण गार होऊ द्यावे.
पूर्ण गार झाल्यावर चांगले मळून घ्यावे.
मोदकाच्या साच्यात छोटे-छोटे गोळे भरुन मोदकाचा आकार द्यावा.

मोदकाचा आकार द्यायचा नसेल तर छोटे गोळे करुन ते चपटे करुन पेढे तयार करावे व त्यावर पिस्त्याचे काप लावावे.
बाप्पाला नैवेद्य दाखवून सगळ्यांना प्रसाद म्हणून खायला द्यावे

रीकोटा चीझऐवजी तुम्ही खवा वापरु शकता. खव्याला आधी चांगले परतून घ्यावे व पुढिल कृती वर दिल्याप्रमाणेच करावी.
गणपती बाप्पा मोरया !!
__/\__