साहित्यः
१.५ वाटी सीडलेस खजूर, तुकडे करुन घ्यावे.
१/२ वाटी बदाम
१/२ वाटी काजू
१/४ वाटी बेदाणे
१/४ वाटी डेसिकेटेड कोकोनट
२ टेस्पून खसखस
१/२ टीस्पून वेलचीपूड
पाकृ:
काजू-बदाम बेताचे चॉप करुन घेणे.
पॅनमध्ये काजू-बदाम कोरडेच हलक्या तांबूस रंगावर भाजून घेणे.
भाजलेले काजू-बदाम प्लेटमध्ये काढावे.
त्याच पॅनमध्ये आता खोबरे + खसखस सोनेरी रंगावर भाजून घ्यावे.
हे सुद्धा वेगळ्या प्लेटमध्ये काढावे.
पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप गरम करुन त्यात चिरलेला खजूर व बेदाणे घालावे.
सतत परतावे, खजुर-बेदाण्याचा गोळा होऊन लागेल तेव्हा गॅस बंद करावा.
मिश्रण गार होऊ द्यावे.

काजू-बदामाची मिक्सरवर भरडसर पूड करुन घ्यावी.
खजूर-बेदाणेच्या मिश्रणात काजू-बदामाची पूड, खोबरे + खसखस व वेलचीपूड घालून चांगले मिक्स करावे.

पेढे-मोदकाच्या साच्यात मिश्रण भरून मोदकाचा आकार द्यावा.
हे मोदक अतिशय चविष्ट बनतात व ह्यात खजूराचा, बेदाण्याचा गोडवा पुरेसा होतो.
हे मोदक तुम्ही गणपतीत प्रसादाला देऊ शकता.
ह्या प्रमाणात १५-१६ मोदक होतात, जास्तं प्रमाणात बनवयाचे असतील तर साहित्याचे प्रमाण वाढवावे.
गणपती बाप्पा मोरया !!
तुम्हा सर्वांना गणेशोत्सावाच्या हार्दिक शुभेच्छा !!
__/\__