साहित्यः
३ वाट्या दूध
४ टीस्पून बासमती तांदूळ २ तास भिजवून त्याची मिक्सरवर भरडसर पेस्ट करून घेणे
एका हापूस आंब्याचा दाट रस (साधारण ४-५ टेस्पून पुरेल)
१/४ वाटी साखर
१ टीस्पून बदामाचे काप
१ टीस्पून पिस्त्याचे काप
१ टीस्पून वेलचीपूड
१/४ टीस्पून केशर
खायचा चांदीचा वर्ख (ऐच्छिक)
पाकृ:
दुध उकळायला ठेवावे.
दुधाला उकळी आली की त्यात भरडसर वाटलेली तांदळाची पेस्ट घालावी.
मध्यम आचेवर सतत ढवळावे, तांदूळ शिजेपर्यंत ढवळत रहावे.
दुध हळू-हळू दाट होऊ लागेल.
त्यात बदाम-पिस्त्याचे काप, केशर व साखर घालून ढवळावे.
शेवटी वेलचीपूड घालून गॅस बंद करावा.
तयार फिरनी एका बाऊलमध्ये काढून ती रुम टेंपरेचरला थंड होऊ द्यावी.
आता त्यात आंब्याचा रस घालून चांगले एकत्र करावे.
फ्रिजमध्ये गार होण्यासाठी ठेवावी.
सर्व्ह करताना मातीच्या बाऊलमध्ये करावी.
वर बदाम-पिस्त्याचे काप पेरावे, केशर घालावे.
वरून चांदीचा वर्ख लावावा.