गाजर अर्धा किलो ,डेसिकेटेड कोकोनट १ वाटी ,साखर अर्धी वाटी ,condensed milk अर्धी वाटी ,मिल्क पावडर २० ग्राम,साजूक तूप ३ चमचे सजावटी साठी बदाम.
कृती:
सर्व प्रथम गाजर धुवून ,त्याची साले काढून ,किसून घ्यावे .
एका कढाई मध्ये साजूक तूप घालून त्यात गाजराचा कीस टाकावा .
थोडा रंग बदले पर्यंत परतावा ,साधारण ५ मिनिटे .
नंतर त्यात condensed milk आणि साखर टाकून परतावे २ मी .परतावे मिश्रण थोडे पातळ होईल ते घट्ट होईपर्यंत परतावे आणि शिजू द्यावे ..
मिश्रण शिजत आले आहे आहे असे वाटले कि त्यात डेसिकेटेड कोकोनट टाकावे ,अजून २ मी .परतून
आच बंद करून मिश्रण गार होण्यासाठी एका ताटात काढावे .
मिश्रण चांगले गार झाले कि त्यात मिल्क पावडर टाकुन एकजीव करावे आणि त्याचे लाडू वळून हवे तसे सजवावे . वर बदामाचे काप लावावेत .
