
साहित्य-
१२५ ग्राम बटर,
१५० ग्राम साखर,
४ अंडी,
२५० ग्राम मैदा,
१ चिमूट मीठ,२.५ चमचे बेकिंग पावडर,
१/४ कप अॅपल किवा ऑरेंज ज्यूस,
१ चमचा लिंबाचा रस + १ चमचा लिंबाची सालं किसून,
५०० ग्राम बरणीतल्या /टिन मधल्या पाकातल्या लाल चेरी (ह्या चेरी आंबटगोड असतात म्हणून फ्लेवरला वॅनिला किवा तत्सम कोणताही इसेन्स न घालता लिंबाचा रस+ सालं घाला.लिंबाचा इसेन्स मिळाला तर ह्या बरोबर तोही १/२ चमचा घाला.)
कृती-
पाकातल्या चेरी चाळणीवर टाकून पाक निथळत ठेवा.
बटर चांगले फेटा,त्यात साखर मिसळा आणि परत फेटा. अंडी फोडून त्यात घाला व फेटा. लिंबाचा रस व किसलेली सालं घाला , लेमन इसेन्स असेल तर तो घाला.
मैदा + बेकिंग पावडर+ चिमूटभर मीठ एकत्र करा व ते वरील मिश्रणात थोडे,थोडे घाला व फेटा. मिश्रण एकजीव झाले की संत्रा किवा अॅपल ज्यूस घाला.
केक मोल्ड ला बटर लावा, त्यावर वरील मिश्रणातल्या निम्म्यापेक्षा थोडे जास्त मिश्रण घाला. त्या मिश्रणावर चेरीज पसरुन घाला व उरलेले मिश्रण घालून चेरी झाकून टाका.
१७० अंश से ला प्रिहिटेड अवन मध्ये ४० ते ४५ मिनिटे बेक करा.
नेहमीप्रमाणेच- केक झाला की नाही ते विणायची सुई किवा सुरी खुपसून पहा. मिश्रण न चिकटता सुई/सुरी बाहेर आली म्हणजे केक झाला.
अवनचे दार उघडून केक तेथे तसाच ५ मिनिटे राहू द्या.
नंतर बाहेर काढून अजून ५ मिनिटे तसाच ठेवा. आणि त्यानंतर जाळीवर काढून पूर्ण गार होऊ द्या.
पिठीसाखरेने सुशोभित करा.
