
साहित्य-
२५० ग्राम मैदा,
२५० ग्राम तूप/लोणी/मार्गारिन,
२५० ग्राम साखर
२ चहाचे चमचे भरून बेकिंग पावडर, १चिमूट मीठ,
५ अंडी, १/४कप दूध
१.५ चमचा वॅनिला अर्क,
२ ते २.५ मोठे चमचे कोको पावडर
कृती-
तूप चांगले फेसून घ्या,साखर घालून फेसा/फेटा/बिट करा.
अंडी घालून फेसा.नंतर वॅनिला अर्क घालून फेसा.
मैदा+बेकिंग पावडर+१ चिमूट मीठ एकत्र करा आणि वरील मिश्रणात हळूहळू मिसळा.
नंतर थोडे दूध घालून मिश्रण एकजीव करा.
आता मिश्रणाचे २ भाग करून वेगवेगळ्या वाडग्यात काढून घ्या.
एका भागात कोको पावडर घाला व चांगले मिक्स करा.
दुसरा वॅनिलायुक्त भाग तसाच पांढरा ठेवा.
केकच्या साच्याला तूप लावून घ्या.
दोन चमचे कोकोयुक्त मिश्रण आणि २ चमचे वॅनिलाचे साधे मिश्रण असे दोन्ही मिश्रणे संपेपर्यंत घाला.
साचा तिरपा करून मिश्रण सगळीकडे सारखे पसरवून घ्या.
अवन प्रीहिट करून घ्या.
१८० अंश से.ला ३५ ते ४० मिनिटे बेक करा.
केक झाला की नाही ते (त्याच्या) पोटात विणायची सुइ किवा सुरी खुपसून पहा.
केक झाला असेल तरीही ५ मि. अवनमध्येच राहू द्या.
नंतर बाहेर काढा व कोमट झाला की जाळीवर काढून रुम टेंपरेचरला येऊ द्या.
नंतर स्लाइस कापा.
