२/३ टोमॅटो किवा १ वाटी तयार टोमॅटो प्युरे,
२/३ मध्यम कांदे,
१ मोठा चमचा गरम मसाला,१ मोठा चमचा धनेजिरे पूड,१ चहाचा चमचा तिखट,
१ चहाचा चमचा कसूरी मेथी, १तमालपत्राचे पान
७/८ काजूबिया, साधारण अर्धी वाटी सुके खोबरे,
१ मोठा चमचा हेवी क्रिम किवा साय,२ मोठे चमचे तेल,१चमचा बटर,
मीठ चवीनुसार, १/२ चहाचा चमचा साखर
थोडी कोथिंबिर गार्निशिंग साठी.
कॄती- खोबरे किंचित लालसर कोरडेच भाजून घ्या व बाजूला ठेवा.
एक चमचाभर तेलावर चौकोनी चिरलेले कांदा व टोमॅटो परतून घ्या. त्यात गरम मसाला, तिखट, धनेजिरे पूड घालून परता, कसूरी मेथी घाला आणि काजूतुकडे घाला व थोडे परता.
खोबरे व ह्या सर्व मिश्रणाची मिक्सर मधून पेस्ट करा.सिल्किश टेक्श्चर येईल.
कढईत १ चमचा तेल गरम करा. त्यात ही कांदा टोमॅटो इ.ची पेस्ट घाला.थोडे पाणी घालून सरसरीत करुन घ्या म्हणजे चांगली ग्रेव्ही होईल. एक तमालपत्राचे पान घाला. उकळू द्या. बटर घाला.
आता उकडलेली अंडी चार भाग करुन घाला व दोन तीन उकळ्या येऊ द्या.
हेवी क्रिम किवा साय घाला.
मीठ व साखर घाला.
१/२ चमचा साखर घालून ग्रेव्ही गोड होत नाही,तर किंचित गोडूस चव येते. ती नको असेल तर साखर घालू नका.
कोथिंबिरीने सजवा.(केवळ कोथिंबिर आणण्यासाठी ५ ,६ किमी जायचा कंटाळा केल्यामुळे फोटोत कोथिंबिर नाहीये..)
अंड्याऐवजी बटाटे,पनीर किवा आपापले डोके लढवून इतर काही घालून अंडेविरहित व्हर्जन करता येईल.
