१ वाटी मैदा
१ टेस्पून ड्राय यीस्ट
१ टेस्पून साखर
किंचित मीठ
१ टेस्पून ऑलिव्ह ऑईल
पाकृ:
एका भांड्यात यीस्ट व साखर एकत्र करा व त्यात १/२ वाटी हलके कोमट पाणी घालून, झाकून ५ मिनिटे बाजूला ठेवा.
भांड्यात मैदा व मीठ मिक्स करुन घ्या.
पाच मिनिटांनंतर यीस्ट फुलून पाण्याला फेस आला असेल, ते यीस्ट + साखर मिश्रीत पाणी मैद्यात थोडे थोडे घालून मिक्स करावे.
त्यात आणखीन १/२ वाटी पाणी घालून सैलसर मैदा भिजवून घ्यावा.
आता ह्या मैद्याच्या गोळयाला चांगले १०-१५ मिनिटे मळावे.
त्यावर ऑलिव्ह ऑईल घालून मळून घ्यावे व एका भांड्यात ठेवावे.
भांड्याला क्लिंग फिल्म लावून भांडे उबदार जागी २ तास ठेवावे.

दोन तासानंतर पीठ छान फुगुन वर आले असेल.
हातांना थोडा मैदा लावून पीठ पुन्हा पाच मिनिटे मळावे व त्याचे सारखे गोळे करावे.
ओव्हन १८० डीग्रीवर प्री-हीट करायला ठेवा.
गोळ्याला कोरड्या मैद्यात घोळवून त्याची पोळी लाटावी. (पिटा-ब्रेड किती लहान-मोठ हवे त्याप्रमाणे लाटावे)
बेकिंग ट्रे किंवा बेकिंग स्टोनवर ठेवून १८० डीग्रीवर ४ मिनिटे बेक करावे, मग उलटवून पुन्हा ४ मिनिटे बेक करावे.
पिटा मऊ हवे असल्यास हे तापमान बरोबर आहे पण जर का डीप्, सॉसबरोबर सर्व्ह करायचे असल्यास थोडा कुरकुरीत करायचा असेल तर २-३ मिनिटे आणखीन ठेवा.
अश्या प्रकारे सर्व्ह पिटा ब्रेड बनवून घ्यावे.

साहित्य चिकन सुवालाकी:
१/२ किलो चिकन ब्रेस्ट फिले
३ टेस्पून सुवालाकी मसाला
१ टेस्पून तेल
नोटः
मी सुवालाकी मसाला ग्रीसवरून आणला आहे पण तो घरी ही बनवता येतो. त्यासाठी स्वीट पॅपरीका, ड्राईड थाईम, ड्राईड अनियन पावडर, ड्राईड गार्लिक पावडर, ओरेगॅनो, हॉट पॅपरीका, मीठ व मिरपूड एकत्र करावे व हा मसाला वापरावा.(हे साहित्य मी आणलेल्या मसाल्यावर लिहिले होते)
कृती:
चिकनच्या तुकड्यांना वरील मसाला व तेल लावून अर्धा तास मॅरीनेट करावे.
लाकडी स्क्युअर्स वापरणार असाल तर दोन तास आधी त्या पाण्यात भिजवून ठेवाव्यात म्हणजे त्या शिजवताना जळणार नाही.
स्क्युअर्स वर चिकनचे पीसेस लावून ग्रील पॅनवर किंचित तेल ब्रश करुन दोन्ही बाजूंनी चिकन ग्रील करुन घ्यावे. तुम्ही हे बार्बेक्यु ही करु शकता किंवा ओव्हनमध्ये ही ग्रील करु शकता.

त्झात्झिकी आणि सर्व्हिंगः
१ वाटी ग्रीक योगर्ट (रोजचे, घरचे घट्ट दही वापरले तरी चालेल)
१/२ वाटी किसलेली काकडी
१ टीस्पून बारीक चिरलेला लसूण
१/२ टीस्पून लिंबाचा रस
१/४ टीस्पून मिरपूड
मीठ चवीनुसार
कृती:
दह्यात काकडी, लसूण, मीठ, मिरपूड व लिंबाचा रस घालून एकत्र करावे.
सॅलॅड्सः
चिरलेली भोपळी मिरची , टोमॅटो, कांदा, लेट्युस, काकडी घेतले आहे.

पिटा ब्रेडवर त्झात्झिकी सॉस लावावा, त्यावर सॅलॅड घालावे, ग्रील केलेले चिकनचे पीसेस ठेवावे.
आवडत असल्यास वरुन थोडा त्झात्झिकी सॉस घालावा व रोल करुन गरम-गरम खावे

नोटः
१. पिटा ब्रेड ओव्हनमधून बेक केल्यावर, पूर्ण गार झाल्यावर प्रत्येक पिटामध्ये बटर पेपर ठेवून तुम्ही झिप-लॉक बॅगमध्ये ठेवून हे ब्रेड फ्रीज करु शकता. २ महिने सहज टिकतात.
पिटा ब्रेड तुम्ही तव्यावरही भाजू शकता.
२. पिट्याला पर्याय म्हणून तुम्ही तोर्तिया, डेली रॅपचा वापर करु शकता पण खरी मजा ग्रीक पिट्यात आहे Smile
३. सॅलॅड तुमच्या आवडीचे वापरु शकता, त्यात ऑलिव्ह्ज, हॅलेपिनोज, ग्रील्ड व्हेजिटेब्ल्स घालून व्हेज सुवालाकी बनवता येईल.
४. मेयोनीज, फ्रेंच फ्राईज, बीबीक्यु सॉस, फेटा चीज ही घालता येईल.
५. त्झात्झिकी सॉस / डिपवर तुम्ही थोडे ऑलिव्ह ऑईल ड्रिझल करुन सर्व्ह करु शकता. आवडत असल्यास त्यात बारीक चिरलेले डिल, मिंट ही घालू शकता.