साहित्यः
१. हापुस आंबे - ४ (ईसीली नाहिच मिळाले तर टिन मधला रस वापरा)
२. व्हिपिंग क्रिम - २५० मिली
३. मँगो जेली १ पाकिट
४. साखर आंब्याच्या गोडिनुसार कमी/जास्त
५. सजावटि साठि (टिप नं २ बघा)
कॄती:
१. आंब्यांचा रस मिक्सर मधुन काढा. गाळण्याने गाळुन घ्या जेणेकरुन टेक्श्चर स्मुथ येईल शीवाय खाताना रेषा/धागे तोंडात येणार नाहित
२. अर्धा कप पाणी मायक्रोवेव मधे एक १५ सें. गरम करुन मँगो जेलीची पुड त्यात घालुन ठेवा
३. लिक्विड क्रिम आणि साखर ईलेक्ट्रिक बीटर ने क्रिम व्हिप्ड होईस्त फेटुन घ्या. बीटर नसल्यास ब्लेंडर मधे फेटुन घ्या पण आवश्यक ती घनता येईस्त मिक्सर हळू हळु करुन फिरवा अन्यथा क्रिम वेगळं होईल
४. आता हलक्या हाताने आंब्याचा रस, जिलेटिनमिश्रित पाणी आणि व्हिप्ड क्रिम मिक्स करा
५. आवडत्या मोल्ड मधे घालुन मुस फ्रिज मधे सेट होण्यास ठेवा. एक ४-५ तासात थंडगार मुस चा आस्वाद घ्या
टिपा:
१. मँगो एवजी त्या त्या सीजनची फळं घालुन वेगवेगळ्या चवीचं मुस बनवु शकता
२. मी आंब्याच्या फोडिंचे क्युब्स करुन बदाम/पिस्त्याच्या कापांनी डेकोरेट केले. पर्याय बरेच आहेत उदा.
अ. सेट झालेल्या मुसवर सर्व करण्याआधी मिक्सर मधुन फिरवलेला आंब्याचा रस घाला व ड्राय फ्रुट्सनी सजवा
ब. सेट झालेल्या मुसवर हलकासा चॉकलेट सॉस झीक झॅक डिझाईन मधे ड्रिझल करा व अर्धी स्ट्रॉबेरी (पानासहित) ठेवा. हेच कॉम्बों उलटंहि करता येईल
क. आंब्याच्या क्युब्स वर कॅरमलाईज्ड झालेल्या साखरेची वेगवेगळि डिझाईन्स पेरा
३. उरलेलं मुसचं मिश्रण डिप फ्रिजर मधे ठेवा. एक उत्तम, स्मुथ टेक्च्शरचं, प्युअर मँगो फ्लेवरचं आईसक्रिम एंजॉय करु शकाल ह्याची खात्री बाळगा
अवांतरः काहि ठिकाणी ह्या मुस मधे अंड्याचा पांढरा भाग पण क्रिम सारखा व्हिप्ड करुन घालतात. मी अंडे वगळले. पण जर अंड वापरलत तर व्हॅनीला ईसेन्स जरुर घाला नाहितर मुस ला अंड्याचा वास येतो. अगदिच शाकाहारी असाल तर जेली एवजी अगार-अगार (व्हेज जेली) घाला.
चला तर मग....अजीबात वेळ दवडु नका. उन्हाळा आणि आंबे आहेत तोवर ह्या मुस चा आस्वाद घ्या.