मैदा - २ १/४ कप
बटर - १/२ कप
साधी साखर - १/२ कप
ब्राउन शुगर - १/२ कप
अंडे - १
व्हॅनिला इसेन्स - २-३ थेंब
चॉकलेट चिप्स - १/२ कप
कुकिंग चॉकलेट - १/२ कप
मिठ १ चिमटी
बेकिंग ग्लास मोल्ड
दुध
कृती:
१. एका मोठ्या बाऊलमधे बटर, साधी साखर, ब्राउन शुगर एकत्र घेउन electric bitter ने फेटुन घ्यावे.

२. साखर चांगली फेटल्यावर त्यात एक अंडे टाकुन परत फेटुन घ्यावे.

३. त्यामधे मैदा, मिठ व चॉकलेट चिप्स टाकुन चमच्याने एकत्र करावे. आता हे पीठ १-२ तास फ्रिज मधे ठेवावे.

४. तो पर्यंत ग्लास मोल्डला बटर लावुन घ्यावे.

५. फ्रिजमधुन पीठ बाहेर काढुन, ते ग्लास मोल्डमधे निट पसरुन घ्यावे. आतमधील कुकी कप जास्त जाडही नको आणि जास्त बारीकही नको.

६. ओव्ह्न १८० degree celcius ला preheat करुन घ्यावा. त्यामधे ग्लास मोल्ड ठेवुन १५-२० मिनिटे बेक करुन घ्यावे.
७. ग्लास मोल्ड बाह्रेर काढुन पुर्ण गार होवुन द्यावे. गार झाल्यावर कुकी कप अलगदपणे मोल्ड मधुन बाहेर काढावे.


८. Microwave मधे कुकिंग चॉकलेट मेल्ट करुन घ्यावे.
९. गार झालेल्या कपास आतुन मेल्टेड चॉकलेट लावुन घ्यावे व परत फ्रिज मधे १/२ तास ठेवुन द्यावे.

१०. कुकी कप गार दुध / चॉकलेट मिल्कशेक / आईसक्रिम सोबत serve करावे.

