साहित्यः
१ वाटी काजू पावडर
१/२ वाटी साखर
१/४ वाटी पाणी
सजावटीसाठी लवंगा
खायचा रंग (मी केशर सिरपमध्ये थोडा खायचा रंग मिसळला आहे)
पाकृ:
नॉन-स्टीक पॅनमध्ये साखर्+पाणी एकत्र करून त्याचा एकतारी पाक तयार करावा.
पाक तयार झाल्यावर त्यात काजू पावडर घालून मिश्रण एकत्र गोळा होईपर्यंत ढवळावे.
मिश्रण कडेने सुटू लागले व त्याचा गोळा होऊ लागला की ताटात काढून थोडे गार होऊ द्यावे.
सधारण कोमट झाले की त्याचे गोळे करुन घ्यावे. (इथे थंड वातावरण असल्यामुळे मिश्रण लगेच गार झाले त्यामुळे मला लगेच त्याचे गोळे करावे लागले)
छोटे गोळे तयार करुन वरुन हलके दाबून घ्यावे.
आता एक न वापरातला रंगाचा ब्रश स्वच्छ धुवून घ्यावा.
खायच्या रंगात बुडवून तयार गोळ्यावर त्याचे स्ट्रोक्स मारुन घ्यावे.
दाबलेल्या भागात लवंग देठ म्हणून रोवून ठेवावी. (तुम्ही देठासाठी पिस्त्याचे काप ही वापरू शकता)

काजू अॅपल तयार आहे. दिवाळीला मिठाई म्हणून तुम्ही खाऊ शकता , खिलवू शकता

तुम्हा सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!.