
साहित्य-
२५० ग्राम साखर,२५० ग्राम मैदा,२५० ग्राम लोणी किवा तूप,५ अंडी,१ लहानसे सफरचंद किवा १/४ कप दूध
२ चहाचे चमचे बेकिंग पावडर,२ चहाचे चमचे वॅनिला अर्क+१ चमचा लिंबाचा रस ,१ चिमूट मीठ
कृती-
लोणी/तूप भरपूर फेटणे (बिट करणे),नंतर साखर घालून फेटणे,अंडी घालून फेटणे.मीठ,वॅनिला इसेन्स व लिंबाचा रस घालून फेटणे.
मैदा+बेकिंग पावडर एकत्र करणे व ते घालून फेटणे.
सफरचंद साल काढून किसणे व ते त्यात घालणे किवा पाव कप दूध घालणे व हलके फेटणे
केकच्या साच्याला बटर लावून घेणे व त्यात ते मिश्रण ओतणे.
अवन प्रिहिट करणे, १८० अंश सेल्सिअस वर ४० ते ४५ मिनिटे बेक करणे. केक तयार झाला की नाही ते सुरी खूपसून पहाणे. सुरीला मिश्रण न चिकटता बाहेर आले तर केक झाला. नसेल तर अजून ५ मिनिटे अवन मध्ये ठेवणे.
केक झाला तरी अवनचे दार उघडून केक तेथे तसाच ५ मिनिटे राहू द्या.
नंतर बाहेर काढून अजून ५ मिनिटे तसाच ठेवा. आणि त्यानंतर जाळीवर काढून पूर्ण गार होऊ द्या. नंतर स्लाइस कापा.
चॉकलेट स्पाँज केक बनवायचा असेल तर वॅनिला अर्काऐवजी ३ ते ४ टेबलस्पून डार्क कोको पावडर घेणे, बाकी कृती तशीच..