जायफळाच्या झाडापासून जायफळ व जायपत्री हे दोन मसाल्याचे पदार्थ मिळतात.जायफळ ही फळातील वाळलेली बी तर जायफळाच्या बी बाहेरील जाड कवचावर लाल रंगाची जायपत्री असते. जायफळाची लागवड करताना नर झाड आणि मादी झाड लावावे लागते. बी पासून होणाय्रा झाडांमध्ये ५० टक्के नरझाडे येतात. त्यामुळे कलम लागवड हाच योग्य पर्याय ठरतो. नरझाडाची फुले आखुड, फुगीर असतात तर मादी झाडाची फुले लांबट असतात. काही झाडे द्विलिंगी असतात.
मादी झाडाला सहाव्या वर्षापासून फळे लागतात. दरवर्षी सुमारे २०० ते ३०० अशी जायफळे लागतात. फळ पूर्ण परिपक्व होण्यासाठी ९ महिन्यांचा कालावधी लागतो. साधारणपणे जून ते ऑगस्ट या कालावधीत सर्वात जास्त जायफळे तयार होतात.पूर्ण वाढ झालेल्या झाडाला १००० पर्यंत फळे लागतात.
आमच्या बागेत तीन जायफळाच्या झाडांची लागवड केली असून आता ती झाडे ५००ते ६०० जायफळे देऊ लागली आहेत.
जायफळाच्या झाडापासून जायफळ व जायपत्री हे दोन मसाल्याचे पदार्थ मिळतात.जायफळ ही फळातील वाळलेली बी तर जायफळाच्या बी बाहेरील जाड कवचावर लाल रंगाची जायपत्री असते. जायफळाची लागवड करताना नर झाड आणि मादी झाड लावावे लागते. बी पासून होणाय्रा झाडांमध्ये ५० टक्के नरझाडे येतात. त्यामुळे कलम लागवड हाच योग्य पर्याय ठरतो. नरझाडाची फुले आखुड, फुगीर असतात तर मादी झाडाची फुले लांबट असतात. काही झाडे द्विलिंगी असतात.
मादी झाडाला सहाव्या वर्षापासून फळे लागतात. दरवर्षी सुमारे २०० ते ३०० अशी जायफळे लागतात. फळ पूर्ण परिपक्व होण्यासाठी ९ महिन्यांचा कालावधी लागतो. साधारणपणे जून ते ऑगस्ट या कालावधीत सर्वात जास्त जायफळे तयार होतात.पूर्ण वाढ झालेल्या झाडाला १००० पर्यंत फळे लागतात.
वर्षभर फळधारणा होत राहते. फळ परिपक्व झाले की फळाच्या खालच्या बाजूने तडकते आणि झाडावरून गळून पडते. अशी गळून पडलेली फळे गोळा करावीत. जून ते ऑगस्ट या महिन्यात तयार फळे वाळवता येत नाहीत ती फ्रीजमध्ये ठेवून पाऊस संपल्यावर ऊन्हात वाळवावी लागतात. जायफळाच्या मुख्य फळाला थोडी आंबटसर चव असते, त्यापासून मुरांबा, लोणचे बनवता येते.
वरील फुलाचे व कळीचे फोटो हे नरझाडाच्या फुलाचे आहेत, आता फळे तयार झाल्याने मादी झाडाची फुले मिळू शकली नाहीत. वार्षिक पाऊसमान १५० सें.मी. पेक्षा अधिक असलेल्या उष्ण व दमट प्रदेशात जायफळाची झाडे चांगली वाढतात. ती समुद्रसपाटीपासून १३०० मीटर उंचीच्या जमिनीत वाढू शकतात. जायफळाच्या लागवडीसाठी चिकण पोयटा, वाळू पोयटा व जांभ्या खडकाची तांबडी जमिन योग्य असते. नारळ सुपारीच्या बागेत जायफळाची लागवड केली जाते. कारण जायफळाच्या झाडाला लहान असताना सावलीची आवश्यकता असते. तसेच बाराही महिने पाणी द्यावे लागते.जायपत्री लाल रंगाची जायफळाच्या बीच्या जाड कवचावर असते. ती काढून उन्हात वाळवली की वापरासाठी तयार होते. जायपत्रीला दर चांगला येतो.