आज रविवार, पै पाहुण्यांचा दिवस म्हणजेच कोंबडीचा घातवार.
नेहमीच्या तांबड्या-पांढर्याि रश्याला फाटा देउन आज तंदुरी करायचा घाट घातला होता.
साहित्यः
२ चमचे घट्ट दही (शक्यतो पाणी काढुन टाकलेल.)
२-३ मोठे चमचे तंदुर मसाला.
१-२ चमचे लाल तिखट.
१/४ चमचा केशरी रंग. (आवडत असल्यास.)
२ चमचे तेल.
१-२ चमचे आल-लसुण पेस्ट.
२ चमचे लिंबाचा रस.
मीठ चवी नुसार.
१ आख्खी कोंबडी. स्वछ धुवुन साफ केलेली.
कृती:
एका भांड्यात वरील सर्व पदार्थ एकत्र करुन घ्यावे.
कोंबडीला सुरीने चरे पाडुन वरील मिश्रण नीट चोळुन चोळुन लावावे. आणि कोंबडी फ्रिज मध्ये किमान १ तास मुरत ठेवावी.
ओव्हन २५० ते २७५ °C वर 15 मिनिटं तापवुन मग कोंबडी शिजत ठेवावी. २५-३० मिनिटांनी वरची बाजू खाली करुन परत २०-२५ मिनिटे शिजु द्यावं.