शाकाहारी पाककृती

दूधीचे मुटकुळे (मुटके)

सर्व शाकाहारी, व्हेगन पाककृती

दूधीचे मुटकुळे (मुटके)

Postby PrabhakarPethkar » Fri Jul 18, 2014 2:44 pm



साहित्यः

दूधी - अर्धा किलो
आलं - १ इंच
लसूण - ४ पाकळ्या
धणे - २ मोठे चमचे (टेबल स्पून)
जीरे - १ मोठा चमचा (टेबल स्पून)
तिखट - १ लहान चमचा (टि स्पून)
हळद - अर्धा लहान चमचा (टि स्पून)
कोथिंबीर - मुठभर
खायचा सोडा - अर्धा लहान चमचा (टी स्पून)
मीठ - चवीपुरतं
तेल - अर्धी वाटी.
चण्याचे आणि तांदूळाचे पीठ समप्रमाणात.

तयारी:

दूधीची साल काढून टाका. दूधी उभी चिरुन (दोनच भाग करायचे) चमच्याने आतल्या बिया काढून टाका. आता दूधी जाड किसणीवर किसून घ्या. दूधीला मीठ लावून दहा मिनिटे ठेवा.
आलं-लसूण वाटून घ्या. धणे-जिर्‍याची पुड करून घ्या.
कोथिंबीर बारीक चिरुन घ्या.

कृती:

किसलेल्या दूधीत आल-लसूण पेस्ट, धणे-जिरे पुड, तिखट, हळद, खायचा सोडा, कोथिंबीर घालून नीट मिसळून घ्या. आतात त्यात मावेल एव्हढे चण्याचे आणि तांदूळाचे पिठ समप्रमाणात मिसळा (साधारणपणे दोन्ही ३-४, ३-४ मोठे चमचे लागेल). मुटका वळता आला म्हणजे झाले.
एका मोठ्या पातेलात बसेल अशी ताटली घेवून त्याला तेल लावा आणि त्यावर हे वरील मिश्रणाचे, मुठीने वळून मुटकुळे/मुटके
बनवा आणि नीट मांडून घ्या. एकच थर लावा. एकावर एक ठेवू नका. पातेल्यात पाणी घालून त्यावर एक चाळणी पालथी ठेवा आणि त्या चाळणीवर मुटकुळ्यांची ताटली ठेवून, पातेल्यावर झाकण ठेवून, १२ ते १५ मिनिटे वाफवून घ्या. पातेल्यात उकळणारं पाणी ताटलीच्या आंत येणार नाही एव्हढेच ठेवा. आंच बारीक ठेवा.
नंतर पातेल्यातून ताटली बाहेर काढून मुटकुळे थंड होऊ द्या.
आता एका फ्राय पॅन मध्ये अर्धीवाटी तेल घेऊन मध्यम आंचेवर तापवा. तेल तापले की एका वेळी पॅन मध्ये मावतील एव्हढेच मुटकुळे, चरचरीत फ्राय करून घ्या.
तांबूस रंगावर फ्राय केलेल्या मुटकुळ्यांचा, गरम असतानाच, दही आणि लोणच्या बरोबर अस्वाद घ्या. हे जेवणात भाजी ऐवजीही खाल्ले जातात किंवा वन डिश मील म्हणूनही खाता येतात.
दूधी प्रमाणेच मेथीच्या पानांचे, मुळ्याचे किंवा दूधी, मुळा, मेथी असे मिश्र मुटकुळेही छान लागतात.

शुभेच्छा...!
PrabhakarPethkar
Distinguished Chef
 
Posts: 2
Joined: Thu Jul 17, 2014 9:13 pm
Name: Prabhakar Pethkar

Re: दूधीचे मुटकुळे (मुटके)

Postby manish » Fri Jul 18, 2014 3:12 pm

काका, तुम्ही स्वतः इथे येऊन लिहायला लागल्यामुळे खूपच आनंद झालाय! :D
हे मुटके दिसतातही एकदम टेंम्प्टींग - लगेच उचलून गरम-गरम खावासा वाटतोय ह्या पावसात! ह्या फर्मास रेसिपीबद्द्ल मनापासून धन्यवाद! :-)
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne

Re: दूधीचे मुटकुळे (मुटके)

Postby neha » Mon Jul 21, 2014 12:13 pm

खरंच मस्त आहेत पावसाळ्यात खायला - बरोबर गरमा-गरम आल्याचा चहा! अजून कय पाहिजे? :-)
neha
A Cook In The Making
 
Posts: 19
Joined: Tue May 13, 2014 10:01 pm
Name: Neha Pune


Return to शाकाहारी पाककृती

Who is online

Users browsing this forum: No registered users and 8 guests