शाकाहारी पाककृती

मश्रुम्स विथ गार्लिक सॉस/डिप (Sautéed Mushrooms with Garlic)

सर्व शाकाहारी, व्हेगन पाककृती

मश्रुम्स विथ गार्लिक सॉस/डिप (Sautéed Mushrooms with Garlic)

Postby madhurad » Tue Feb 17, 2015 5:09 pm

जर्मनीतील नाताळच्या मार्केट्स मध्ये मिळणारा चटपटीत असा हा खाद्यप्रकार. कडाक्याच्या थंडीत हे मश्रुम्स, सोबतीला ब्रेड आणि ग्लुवाईन हे कॉम्बिनेशन म्हणजे निव्वळ सुख. याचे मूळ जर्मन नाव Champignons mit Knoblauchsoße. Champignons म्हणजे मश्रुम्स आणि Knoblauchsoße म्हणजे लसूण, दही, क्रीम यापासून केलेला एक डिपचा प्रकार. नाताळ मार्केट्सच्या स्टॉल्स वर बघून कसे करतात याचा अंदाज आला होता, सोप्पा वाटला. आंतरजालावर अजून थोडी शोधाशोध केली. त्यावरून मी केलेली पाककृती येथे देत आहे. यात तुम्ही आवडीनुसार बदल करू शकता.

साहित्य -
५०० ग्रॅम मश्रुम्स (शक्यतो लहान आकाराचे घेतले तर जास्त चांगले)
१ मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून
चवीपुरते मीठ
२-३ टेबलस्पून तेल
मिरपूड
कोथिंबीर

गार्लिक सॉस/डिप साठी

४-६ मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या (आवडीनुसार कमी जास्त)
१/३ वाटी घट्ट दही/योगर्ट
१/३ Crème fraîche / सावर क्रीम
१/३ वाटी मेयोनीज (ऑप्शनल)

कृती -

गार्लिक सॉस विकत मिळाल्यास ते थोड्या दह्यात मिसळून किंवा तसेच वापरू शकता. अन्यथा हे खालीलप्रमाणे घरी करू शकतो.

१/३ वाटी घट्ट दही, १/३ Crème fraîche / सावर क्रीम (Sour Cream), १/३ वाटी मेयोनीज (Mayonnaise) हे सगळे एकत्र करून घ्या. यात चवीपुरते मीठ घाला. लसूण पाकळ्या बारीक करून घाला. आवडत असल्यास सुकवलेली कोथिंबीर, शेपू, कांद्याची पात किंवा तत्सम हर्ब्ज घाला. सर्व मिसळून घ्या. सॉस तयार आहे.
मेयोनीज वगळून सुद्धा हे करता येते. लसणाची अजून चव हवी असल्यास लसूण पावडर सुद्धा वापरू शकता.

मश्रुम्सचे देठ काढून घ्या. मोठे मश्रुम्स असतील तर अर्धे तुकडे करू शकता.
एका भांड्यात तेल गरम करा. तेल गरम झाले की त्यात कांदा घाला. कांदा ब्राउन होत आला की मश्रुम्स घाला. दहा ते पंधरा मिनिटे मश्रुम्स ब्राऊन रंगावर परता. मश्रुम्स शिजत आले की मीठ आणि मिरपूड घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. सगळे एकत्र करून २ मिनिटे परता.

गरमागरम मश्रुम्स प्लेटमध्ये काढून त्यावर गार्लिक सॉस घाला. आवडीच्या ब्रेड सोबत सर्व्ह करा.
आवडत असल्यास वाफाळती ग्लुवाईन घ्या आणि खायला सुरुवात करा.

Guten Appetit!



madhurad
A Cook In The Making
 
Posts: 4
Joined: Thu May 08, 2014 6:42 pm
Name: Madhura Deshpande

Re: मश्रुम्स विथ गार्लिक सॉस/डिप (Sautéed Mushrooms with Gar

Postby manish » Tue Feb 17, 2015 9:12 pm

Divine दिसते आहे हे एकदम!!!! :-)
सावर क्रीम इथे कुठे मिळेल काय माहित, पण ग्लुवाईन बरोबर म्स्तच लागेल!!! करून पहायलाच पाहिजे - इतकी सुंदर रेसिपी इथे दिल्याबद्द्ल मनापासून आभार! :-)
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne

Re: मश्रुम्स विथ गार्लिक सॉस/डिप (Sautéed Mushrooms with Gar

Postby Bosky » Fri Feb 20, 2015 2:22 pm

यम्मी दिसतय !नक्की करणार :)
Bosky
A Cook In The Making
 
Posts: 19
Joined: Tue Mar 25, 2014 6:44 pm
Name: BoskyTH


Return to शाकाहारी पाककृती

cron

Who is online

Users browsing this forum: No registered users and 36 guests